कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या पथ्यपाण्याची अनुभवसिद्ध आचारसंहिता

ऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६

१. किमो संपेपर्यंत पाणी उकळून गार करून प्यावे. रोज ४-५ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.

२. नारळाचे पाणी (शहाळे) नियमितपणे पिणे गरजेचे आहे. पाणी काढून ठेवू नये. लगेचच प्राशन करावे.

३. कच्चे काहीही खावयाचे नाही. शिजवलेले व पचण्यास हलके अन्न खावे.

४. फळांचे रस अथवा फळे वा सॅलड खाणेचे नाही.

५. गर्दीच्या ठिकाणी जाणेचे नाही. प्रवास पूर्ण बंद करावा.

६. आइस्क्रीम वा कोल्ड्रिंक्स प्रकृतीस मानवत असेल तरच घेणे.

७. खालीलप्रमाणे सूप घेणे अत्यंत गरजेचे आहे

एक गाजर + चार-पाच पालकाची पाने + एक मध्यम टोमॅटो + एक बीटचा तुकडा + दीड-दोन इंच दुधी भोपळ्याचा तुकडा + एक चमचा कच्चे जिरे एकत्र करून पाणी घालून प्रेशर कुतरमध्ये शिजवणे. मग मिक्सरमधून काढून मीठ मिरपूड साखर घालून चोथ्यासह घेणे. चोथा पोटात जाणे अनिवार्य आहे.

८. दर दोन तासांनी काही तरी खाणे. भूक नसेल वा उलट्या होत असतील तरी खाणे गरजेचे आहे.

९. खजूर + काळ्या मनुका + सुक्या अंजिराचा तुकडा दुधात भिजवून खाणे.

१०. नाचणीचे सत्त्व अथवा नाचणीच्या भाकरीचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे.

११. नागरमोथा पावडर + आवळा पावडर + जांभूळ बी पावडर प्रत्येकी अर्धा चमचा काचेच्या पेल्यात रात्रभर पाण्यात घालून ते पाणी उठल्या उठल्या चहापूर्वी घेणे. चोथा काढून टाकणे.

१२. रात्री धण्यांवर अर्धा किंवा एक लिटर उकळते पाणी टाकून रात्रभर ठेवणे व दिवसभर ते पाणी पिणे.

१३. साळीच्या लाह्या मूठभर भिजत घालून ते पाणी पिणे.

१४. गाईचेच तूप व दूध घेणे.

१५. सलाईनमधून किमो दिल्यावर तुरटी उगाळून इंजेक्शनच्या जागी लेप देणे म्हणजे पुढच्या वेळी शीर सापडायला त्रास होत नाही.

१६. बाहेरचे पाणी व अन्न टाळावे. जनसंपर्क टाळावा कारण प्रतिकारशक्ती कमी झाल्याने जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो.

१७. सर्दी खोकला ताप जुलाब झालेल्या व्यक्तीपासून दूर राहणे. तोंडावर मास्क घालणे. जमेल तितकी विश्रांती घेणे. प्रकृतीची तक्रार जाणवल्यास किमो डॉक्टरांचा सल्ला घेणे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय साधी क्रोसीनही घेऊ नये. हे महत्त्वाचे आहे. किमो सुरू असताना इतर औषधे घेणे वर्ज्य असते.

१८. तेलकट तिखट व मसालेदार पदार्थ अजिबात खाऊ नयेत.


वरील सर्व पथ्यपाणी करून मी ह्या रोगातून पूर्णपणे मुक्त झाले असून माझी सर्व कामे पूर्वीच्याच उत्साहाने करते. हे अनुभवसिद्ध आहे. ह्या पथ्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

- सौ. शारदा प्रकाश दाते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा