जैसे थे

सात्विकतेची शाल पांघरून,
मंदिराच्या पायऱ्या चढाव्या,
अहंकार उतरवून ठेवावा तेथे,
जेथे वहाणा ठेवाव्या 
षड्रिपूंचे अलंकार उतरून,
टाकावे पुढच्या पायऱ्यांवर,
विवेक वैराग्याचे दान मागत,
नजर कळसावर 
घेऊन स्वच्छ अंतर्बाह्य काया,
मंदिरात प्रवेशावे,
पडावे देवाजीच्या पाया 
गाभाऱ्यात त्याच्यासमोर
निवांत बसावे,
त्याच्याकडच्या शांतीला
मनात भरून घ्यावे
जडावलेली पावले घेऊन
मंदिरा बाहेर यावे ,
मिळवलेले सारे गमावून ,
त्याच वहाणांनी, पुन्हा घरी परतावे .


युगंधरा परब








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा