नदी


ऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६
भव्य आकाश, उत्तुंग शिखर 
एका छोट्याशा कपारीत 
अवचित झाला तीचा उगम 
अगदी नाजूक जणू मोरपंख 
कोमल झरोक्यातून सुरु झाले प्रवाही जीवन 
जात्या ती काटक नी नटखट, 
कोणासाठीही न थांबता 
लगेच सुरु केली उतरण 
खळखळत, सळसळत 
स्वतःच्या धुंदीत 
निघाली तीची स्वारी 
बेभान गुर्मीत 
वाटेत भेटले खूप सारथी 
छोटे छोटे झरे कानोकोपरी 
सर्वांची साथ घेऊन साजरी
तीने घातली भूलोकीला गवसणी 
बघता बघता विस्तार आला 
नाजूक पणाचा कायापालट झाला 
जीवन, माता उपमा मिळाल्या 
कधी तिच्यावर बांध घातले गेले 
तर कधी तीचे मार्गही बदलावले 
पण थांबणे जसे तिच्या मुळातच नव्हते 
नावाचं तर तीचे जीवनधारा होते 
सर्वांची तृष्णा भागवली 
पण स्वतः मात्र अतृप्तच राहिली 
तिचे पक्त एक लक्ष्य  
विशाल सागराशी एकरूप होण्याचे स्वप्न 
शांत झाली ती सामावताच सागरात 
स्वतःचे स्वत्व मात्र गमावले त्याच्या बरोबरच्या मीलनात 
पण तीचा प्रवास इथेही नाही थांबला 
परत प्रवृष होऊनी बारसण्यास आतुर झाला

- सुचित्रा खुराना


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा