वेटलाॅस "पण" !

फिगर काॅन्शस होऊन मनाने केला एकदा वेटलाॅसचा पण ॥
मग फिटनेससाठी नक्की काय करावे या विचाराने भांबावून गेले मन ॥१॥

झुंबा, पाॅवर योगा आणि सुरू केला माॅर्निंग वाॅक ॥
वजनाचा आकडा मात्र एकाच जागी लाॅक ॥२॥

अॅक्वा अॅरोबिक्स म्हणू नका, जीम म्हणू नका, ट्राय केले प्रोटिन शेक अन वेगवेगळे फ्रुट-स्क्वॅश ॥
कसले काय हो मोठ्यामोठ्या बाता आणि नावच नुस्ती पाॅश  ॥३॥

बर! डाएटविषयी म्हणाल तर अनेकांचे वेगवेगळे सल्ले आणि मतं ॥
कोणी म्हणे सगळं खाऊन, तर कोणी म्हणे उपाशी राहूनच वजन कमी होतं ॥४॥

माझा वेटलाॅसचा प्रयत्न बघून नवरा म्हणे "करा आता हिरोइन सारखी zero फीगर "॥
मी म्हणाले "zero"?  छे! आपल्याकडे कुठेत त्यांच्यासारखे तैनातीला पाच-पन्नास नोकर ॥५॥

इतक्या असफल प्रयत्नानंतर पदरी आली निराशा ॥
तेव्हा एका मैत्रीणीने पुस्तक हाती दिले "वेटलाॅस तमाशा" ॥६॥

प्रख्यात डायटिशन ऋजुता दिवेकर हिची या पुस्तकात सरळ सोपी भाषा ॥

पुन्हा एकदा मनात निर्माण झाली नव्या उमेदिची आशा ॥७॥
-
अमृता महेश कुलकर्णी



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा