कविता - मैत्री

कळीसारखी नाजुक
पण फुलासारखी खिळणारी,
तालासारखी पक्की
पण सुरासारखी खेळणारी.
डोंगरासारखी अचल
पण नदीसारखी वहाणारी,
चंद्रासारखी शांत
पण सूर्यासारखी चमकणारी.
ताऱ्यांसारखी विखुरलेली
पण अडचणीत एकत्र येणारी,
समुद्रासारखी गहन
पण मस्तीचे खारटपण आणणारी.
भाजीसारखी चवदार
पण कांद्यासारखी रडवणारी,
सोबत फक्त हस्य
पण सर्व भावनांनी भरणारी.
मैत्री माझी दिव्यासारखी,
पण आयुष्यभर जळणारी...

- अनुष्का कुलकर्णी 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा