संपादकीय

ऋतुगंध समिती २०१९-२० चा हा शेवटचा अंक आपल्यापुढे सादर करताना विशेष आनंद होत आहे. गेल्या मार्च महिन्यात आम्हाला ऋतुगंध ची जबाबदारी सोपवली तेव्हा पुढील ११ महिन्यातच ६ अंक आणि त्यातील एक रौप्यमहोत्सवी सांगता विशेषांक काढण्याचे आव्हान आमच्या समोर होते.परंतु माझ्या सहकाऱ्यांच्या आणि लेखकांच्या उत्साहामुळे हे काम खूप सोपे झाले.

उपसंपादक निरंजनने प्रूफ तपासणी तर दीपिका ने अंक जुळणी चे काम मन लावून केले. जनसंपर्क सांभाळायला नंदिनी ने मदत केली. रौप्यमहोत्सवी अंकाची जुळणी करताना वर्षा आणि श्यामल यांनी कष्ट घेतले.

अंकासाठी साहित्य मिळविणे हे मोठेच जिकिरीचे काम आहे असे काही संपादकांचे अनुभव ऐकले होते. वर्षाच्या सुरुवातीलाच श्रीकांत जोशी,अरुण मनोहर, शैलेश दामले, वृंदा टिळक, विवेक वैद्य, ओंकार गोखले यांनी लेखमाला लिहायचे मान्य केले. हेमांगी वेलणकर, नितीन मोरे, तेजश्री दाते यांनीही सर्व अंकांसाठी लेख वेळेत आमच्या हाती दिले.

गेल्या दहा वर्षात महाराष्ट्र मंडळ आणि ऋतुगंध साठी वेगवेगळ्या प्रकारे काम करायला मिळाले. त्यामुळे नवीन काही शिकण्याची संधी तर मिळालीच शिवाय नवीन मराठी मित्र मैत्रिणीही जोडता आल्या हे महत्त्वाचे.

ब्लॉग ची पेजेस तयार करून अंक जुळणीच्या कामाची एक माहिती पुस्तिका यावर्षी दीपिका ने तयार केली आहे. त्याचा उपयोग करून पेजेस बनविण्याचे काम मला शिकायला मिळाले.

महाराष्ट्र मंडळ कार्यकारिणी, ऋतुगंध समितीतील माझे सहकारी यांच्या वतीने सर्व लेखक वाचकांचे मनःपूर्वक आभार.

अंक वाचून प्रतिक्रिया जरूर द्या ही विनंती.

स्नेहांकित,
राजश्री लेले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा