रंग

ऋतुगंध वर्षा - वर्ष १२ अंक ३

इतके सारे रंग फुलले आहेत 
एकमेकांच्या शेजारी कसे खेटून बसले आहेत
रेखाटणार्‍याने तर फुलांची कमळे फुलवली 
बघणार्‍याने त्यात आपापली आवड शोधली 

कोणाचा कोणता आवडता 
तर कोणाचा कोणता 
मीच कसा छान असं प्रत्येक 
रंग पटवून देणारा 

सुरुवात तर होते 
प्रत्येकाची पांढऱ्या रंगातून 
पण लक्षात राहील का त्यांना 
हे मिळालेल्या स्वातंत्र्यातून?

- दिपाली प्रभू 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा