ऋतुगंध वर्षा - वर्ष १२ अंक ३
पाऊस आनंद
पाऊस स्वछंद
पाऊसलेणी पाऊसलेखणी
बरसणार्या मेघांची रिमझिम गाणी
पाऊस नाद पाऊस रान
सृष्टीच्या तालाचे अखंडित पान
पाऊस गंध पाऊस धुंद
मनाच्या अवकाशातला आंतरिक छंद
पाऊस साथ पाऊस विश्वास
तरंगणार्या पाकळीचा मंद सुवास
पाऊस शांत पाऊस आश्वस्त
सृष्टीच्या चराचराचा एकमात्र मित्र
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा