ऋतुगंध ग्रीष्म - वर्ष १२ अंक २
एकला चालो रे
पण एकत्रच,
एकलेपण प्रत्येकाचं,
वेगळालं, नाहीच;
हा एकलेपणा,
सगळ्यांना पुरून उरतो,
सगळ्यांच्या वाट्याला,
तो येतोच येतो;
हा एकलेपणा,
तुझा नि माझा,
आपल्या सा-यांचा,
चराचराला बांधणारा
धागा अगदी अतूट;
हा एकलेपणा,
दरवळतो...
जथ्यांच्या गाॅसिप्समधून,
ढळतो...
वार्धक्याच्या पापणीतून,
डोकावतो...
बाल्याच्या लुटुपुटुच्या भांडणातून;
हा एकलेपणा,
अरे हाच तर
माझा सोबती सच्चा,
जन्म-जन्मांतरीचा.
- अर्चना रानडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा