माझ्या पाऊलखुणांखालची पायवाट

काही तुकडे माझ्यातले 
कुठे - कुठेसे विखुरले 
नाही ठाऊक मला 
कसे कधी ते निसटले 

काही दडले 
विस्मृतीच्या धुक्याआड 
काही आहेत अजुनी 
एकाच हाकेच्या पल्याड 

रिक्त पोकळ्या उरलेल्या 
काही तशाच राहिल्या 
काहींना जोडली ठिगळे 
काही जखमांसारख्या भरल्या 

मी गेले पुढे 
की तेच मागे राहिले 
पूर्ण मी त्यांच्याविनाही ?
तेच अधुरे राहिले …
तेच अधुरे राहिले …

- अर्चना रानडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा