रात्र

आपल्यामधून उसळणारी एक रात्र 
संवादाची, जाणीवतेची
रात्र आपल्याला सांधणारी 
आपल्याला दुरावणारी
एका रात्रीच्या धाग्यानं 
जोडलेले आपण,
एका रात्रीच्या धाग्यानं 
दुरावलेले आपण

आपण - काल आणि उद्या
अन् आपल्यामधून उसळणारी ही असह्य रात्र 
वर्तमानाची डॉ. लता देवकर