ऋतुगंध शिशिर - साहित्य आवाहन

उत्पत्ती, स्थिती आणि लय या सृष्टीच्या तीन अवस्था आहेत   आणि संपूर्ण विश्वात त्याला कोणीही अपवाद नाही. उंच गेलेला झोका खाली येतो, हिरवी पाने शिशिरात पिवळी होऊन गळून पडतात, उगवतीचा सूर्य हळूहळू मावळतीला जातो, संध्याछाया दाटत जातात, रंगलेल्या मैफिली हळूहळू उठतात, गाण्यांचे सूर वाऱ्यावर विरत जातात आणि निरोपाचा क्षण येऊन ठेपतो. पुनर्मीलनाची आशा ठेवून, परत एकदा झोका आणखी उंच नेण्याची ईर्षा बाळगून, पुनरेकवार मैफिल जमवण्याची वचने देऊ-घेऊन सांगता होते. २०१८-१९ च्या ऋतुगंध संपादन समितीचा हा शेवटचा अंक. म्हणून ह्या अंकात अशा निरोपाच्या आठवणींच्या, लय-विलयाच्या, संध्याछायांच्या हृद्य आठवणी, कथा कविता मागवत आहोत. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अशा क्षणांना शब्दरुप देऊन आमच्याकडे पाठवा.
अर्थात नेहमीप्रमाणेच विषयाची अशी काही मर्यादा नाही. आपल्या मूळ गावीचे शिशिर ऋतुतले अनुभव, सणवार, खानपान याबद्दल किंवा आणखी आपल्याला वाटेल त्या विषयावर लिहून टेक्स्ट किंवा वर्ड फॉर्मॅटमध्ये rutugandha@mmsingapore.org ह्या पत्त्यावर २३ फेब्रुवारी पर्यंत पाठवावे ही विनंती.

आपल्या कलाकृतींची आम्ही वाट पाहू.

धन्यवाद!

सस्नेह,
ऋतुगंध संपादन समिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा