एका रुपयाचं मनोगत

US डॉलरच्या मागे मी चढतो आणि गडगडतो,
सगळे चिंताग्रस्त होतात, जेव्हा माझा भाव घसरतो.

मी जेव्हा खेळतो घसरगुंडी,
तेव्हा सगळ्यांचीच उडते, घाबरगुंडी.

शेअर मार्केट, इन्वेस्टमेंट केवढ्या त्या उलाढाली,
मी सुद्धा अगदी दबून जातो ह्या सगळ्या ओझ्याखाली.

दलाल स्ट्रीट, NASDAQ माझीच चर्चा सगळीकडे,
सिंगापूर डॉलर, दिरहाम, दिनार ही माझीच भावंडे

पण US डॉलरचा नंबर मात्र कायमच वरचा.
मला मिळवण्याकरता केवढा तो आटापिटा,
जरी पत्कराव्या लागल्या कोणत्याही वाटा.

कधी मी श्रीमंतांच्या महागडया वॉलेट मध्ये बसतो,
तर कधी भिकाऱ्याच्या कटोऱ्यात पण दिसतो.

मला कमवताना राहात नाही लोकांना वेळेचंही भान,
साम, दाम, दंड, भेद, मध्येही माझं महत्वाचं स्थान.

चला, खूप झाल्या गप्पा आता करतो राम, राम.
कारण दाम करी काम वेड्या, दाम करी खरंच कुठलंही काम.


मेघना असेरकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा