परिवार वार्ता

जाईचा मांडव - कथा अभिवाचन : मोहना कारखानीस 

१० मे ला मुंबईमध्ये सावरकर सेवा केंद्राच्या सभागृहात मोहना कारखानीस यांच्या 'जाईचा मांडव' ह्या कथा संग्रहातील निवडक कथांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम झाला. त्यांच्या कथा दिग्गज लेखक/ लेखिकांच्या खास शैलीतून ऐकणे हा अविस्मरणीय अनुभव होता! 

आव्हाड सर, गौरीताई आणि संपदा ह्यांनी कथांचे सादरीकरण केले. ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले. तसेच पार्ला को.म.सा. प. शाखेच्या लता गुठे आणि सुनील देवकुळे हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा