ब्रोकोली सूप (बॉक चॉय व स्नो पीज सोबत) रेसिपीसाहित्य:

ब्रोकोली 1
बॉक चॉय : 1
स्नो पीज (हिरव्या वाटण्याच्या कोवळ्या शेंगा) : 6
लसूण : 1 पाकळी
आले : 1/2 टीस्पून किसून
काळे मिरी : 1 टीस्पून ताजे कुटून
दूध : 3/4 कप
मीठ : चवीपुरते
बटर/ऑलिव्ह ऑइल : 1 टेबलस्पून

कृती:

1) प्रथम भांड्यामधे पाणी उकळावे.
2) त्यात ब्रोकोली, बॉक चॉय, स्नो पीज, आले, लसूण, काळी मिरी, मीठ घालावे.
3) भाज्या शिजेपर्यंत उकळाव्यात.
4) सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटावे.
5) एक मध्यम आकाराचे भांडे घेऊन गॅसवर मध्यम आचेवर ठेवून त्यात बटर किंवा ऑलिव्ह ऑइल घालून त्यात वाटलेले मिश्रण घालावे.
6) मिश्रणाला ऊकळी आली कि त्यात सतत ढवळत राहून दूध घालावे व आपल्या पसंतीनुसार चव घेऊन त्यात तळलेले पावाचे छोटे चौकोनी तुकडे घालून गरम असतानाच प्यायला द्यावे.

- ईशा मुंगरे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा