गंध

अंगणातल्या तारेवर येणार्‍या पक्ष्यांसारखी ... 
काही माणसे किलबिलत येतात,
आनंदाने झोके घेत विसावतात ! 
चिवचिवणारे दोन शब्द बोलून,
पंख फुलवत उडून जातात ! 

मागे वळून पाहिले तर,
दरवळणारी एक वाट भेटते !
तिच्यावरचे सुगंधित कण वेचून,
माझी रिक्त झोळी भरुन जाते !


- यशवंत काकड 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा