एकांत

एकांत हवा, मज एकांत हवा,
दु:ख माझे व्यक्त करण्या,
मज एकांत हवा.

दु:ख माझे, आतल्या आत कोंडलेले,
दुथडी भरून, मनभर पसरलेले.
निचरा त्याचा होण्या, एकांत हवा,
मज एकांत हवा.

साऱ्यांना भेटते नेहमी मी, स्वतःला कधी भेटू मी?
मला भेटण्या मी, एकांत हवा,
मज एकांत हवा.

-सुवर्णा अशोक जाधव 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा