ऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६
सखी बंद झाला बार हा
आता तरी येशील का ?
व्हॅलेंटाईन्सची रात्र हि
आली तशी गेली सुनी
हा पेग अंतिम घेतला,
मज साथ तू देशील का ?
डोळ्यात आहे धुंदी ही,
ओठात फोरस्क्वेयर चेपली
ती सिगारेट लावायला
तू लायटर देशील का ?
“चल निघ आता बघ वेळ झाली”
सांगतो वेटर सुद्धा
थांबेन तरीही पळभरी मी
संगे तू येशील का ?
- शेरलॉक फेणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा