सिंगापूर येथे
स्थित आणि महाराष्ट्र मंडळाच्या सदस्या दीपिका अभिजीत कुलकर्णी यांनी नुकतीच
सिंगापूर येथील अमेटी ग्लोबल इन्स्टिटयूट मधून अँग्लिया रस्किन युनिव्हर्सिटी, युके अंतर्गत एम बी ए (मार्केटिंग) ही पदव्युत्तर
पदवी विशेष प्राविण्यासह मिळविली. ५ ऑगस्ट रोजी, मरिना बे सँड्स येथे अमेटी ग्लोबल
इन्स्टिटयूट च्या वतीने पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यात दीपिका
यांना अभ्यासक्रमात प्राविण्यासह सर्वोच्च गुण संपादन केल्याने "टॉप स्टुडन्ट
इन कोहार्ट" हे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या पदवीदान समारंभास अमेटी
ग्लोबल इन्स्टिटयूटचे मुख्य संचालक अजय चौहान, प्राचार्य डॉ. मूर्ती व अँग्लिया रस्किन युनिव्हर्सिटी येथील प्रतिनिधी
यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
दीपिका ह्या
महाराष्ट्र मंडळ,
सिंगापूर
ह्यांच्या ऋतुगंध ह्या द्वैमासिकाच्या ब्लॉग संयोजक म्हणून सुद्धा काम करतात.
दीपिका ह्यांचे
समस्त मंडळातर्फे मनापासून कौतुक आणि त्रिवार अभिनंदन!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा