अध्यक्षांचे मनोगत

नमस्कार मंडळी!

सर्वप्रथम ऋतुगंध समिती २०१५ चे गेल्या वर्षभरात अनेक उत्कृष्ट अंक प्रकाशित केल्याबद्दल मनःपूर्वक आभार. त्याचबरोबर ऋतुगंध blog , काव्यविशेषांक, काव्यस्पर्धा यांसारख्या नवीन कल्पना राबवण्यात आणि ऋतुगंधसाठी चांगले साहित्य मिळवणे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणे यासाठी social media चा केलेला यशस्वी वापर याबद्दल नीतीन मोरे आणि त्यांच्या चमूचे विशेष कौतुक. मला खात्री आहे की ऋतुगंध समिती २०१६ सुद्धा असेच आणि नवीन उच्चांक गाठेल. संपादिका जुई चितळे आणि तिच्या सहकाऱ्यांना माझ्या शुभेच्छा.

सिंगापूरमधील इतर प्रादेशिक मंडळांशी तुलना केली तर महाराष्ट्र मंडळाएवढे कुठलेच मंडळ सक्रिय नाही असे आपण अभिमानाने म्हणू शकतो. अशा मंडळाच्या वाटचालीत अध्यक्ष म्हणून योगदान देण्याची संधी या वर्षी मला मिळाली ह्याचा आनंद वाटतो. कार्यकारिणीमधल्या अतिशय गुणी सहकाऱ्यांच्या साथीने ही वाटचाल मंडळाची परंपरा आणि लौकिक वृद्धिंगत करेल याची खात्री आहे.

तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि त्यामुळे सभासदांच्या उंचावलेल्या अपेक्षा यांमुळे ममसिंचे प्रशासन आज एका महत्वाच्या टप्प्यावर उभे आहे. हे आव्हान स्वीकारुन सभासदत्व आणि आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन १००% automated करायचा मनसुबा आहे. तांत्रिक साधने वापरून मंडळाच्या कामकाजाचा व्यावसायिक दर्जाही आणखी उंचावण्याचा प्रयत्न कार्यकारिणी यावर्षी करणार आहे.

संदेश जास्त झटपट व परिणामकारकपणे लोकांपर्यंत पोचवण्याच्या उद्देशाने social media चा कल्पक उपयोग करायचे योजिले आहे. विविध कार्यक्रमात व उपक्रमात भाग घेणारे सभासद, झटून काम करणारे कार्यकर्ते यांच्या पाठीवर कौतुकाचा हात फिरवायला आणि तुमच्या बरोबर थेट संवाद साधण्यासाठी सुद्धा social media ला हाताशी घेणार आहोत. तरी आपल्या (MMS) Facebook page ला follow करा, आमच्या posts like करा , त्या share करा आणि आपला अभिप्राय comments च्या स्वरुपात आमच्या पर्यंत नक्की पोचवा.

सालाबादाप्रमाणे गुढी पाडवा, गणेशोत्सव, दिवाळी हे सण आपण एकत्र साजरे करुच. तसेच वाचनालय, ऋतुगंध, शब्दगंध, स्वरगंध हे मंडळाचे उपक्रमही नित्यनेमाने चालवू. पण यांशिवाय नवीन आणि वेगळे कार्यक्रम देण्याचा मानस आहे. या साऱ्यांत तुमचा सहभाग आणि पाठिंबा गृहित धरते. तुमचे मत आणि सूचना मोलाच्या आहेत. त्या आम्हाला नक्की कळवत रहा.

लवकरच भेटूयात !


आपली,

अस्मिता तडवळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा