स्वतःवर प्रेम करा

स्वतःवर प्रेम करा पण इतकंच 
की स्वतःपलिकडे जगता आलं पाहिजे 

स्वतःवर प्रेम करा पण इतकंच 
की स्वतःलाही जोखता आलं पाहिजे 

स्वतःवर प्रेम करा पण इतकंच 
की स्वतःचा द्वेषही करता आला पाहिजे 

स्वतःचा द्वेष करा पण इतकाच 
की स्वतःवर प्रेमही करता आलं पाहिजे 

- अर्चना रानडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा