गणपती आले गणपती आले ……

मन मोर हे गात नाचू लागले
ह्या वर्षी अघटित घडले
पावसाचे आगमनही गणपतीसवे झाले
कृपेविण सर्व फोल ठरले
कृपावर्षावानेच धन्य त्यांनी केले ...

तना मनाने जर त्यांना पूजले
त्यांनी कमी कधी कोणा न दिले
जर जगतनिर्मात्याला मानले
तरच हे जग जाईल तरले

संस्कृतीला जर नाकारले
तर मग शाश्वत कोण उरले?
वचन एकदा तुम्ही दिले
व्रतस्थ होवून जर पाळले
चिंतामुक्तीचे कोडे उलगडले

दर वर्षी म्हणा गणपती आले …
पुढच्या वर्षी भेटू सांगून गेले !!!!!


मृणाल देशपांडे