जिद्द सोडू नका

मित्रहो, जिद्दी माणसंच इतिहास घडवतात आणि सामान्य माणसं त्यातून प्रेरणा घेतात. तेव्हा तुम्ही सुध्दा तुमच्या ध्येयांविषयी ‘जिद्दी‘ असलंच पाहिजे. जिद्दी असाल तरच ती पूर्ण होतात. कारण जिद्दी माणसं कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाहीत व हार मानणारी माणसं जिद्दी राहत नाहीत.

आपण अनेकदा पाहतो की आपल्यापैकी अनेकांना (फुकटची) अनेक स्वप्न असतात. स्वप्न असावीत नाही असं नाही. परंतु त्यासाठी लागणारी मेहनत, कष्ट, परिश्रम, परीक्षा, प्रवास करण्याची शारीरिक आणि मानसिक तयारी मात्र नसते. अशा परिस्थितीत फुकटचे, न मागता सल्ले देणारे बरेच महाभाग आपल्या आजूबाजूला असतात. ज्यांना आपण बोली भाषेत मित्र असं म्हणतो, ते ‘शार्टकट‘ सांगतात. जो की त्यांनी स्वतः कधीही अवलंबलेला नसतो, आणि आपली फसगत होते, हे वेगळं सांगायला नको. अनेक ठिकाणी तर आपण अक्षरशः तोंडघशी पडतो, आणि आपला ‘शेख चिल्ली‘ होतो.

तेव्हा तुमच्या स्वप्नांना लवकरात लवकर ध्येयात रूपांतरित करा. ती पूर्ण करण्यासाठी लगेच कंबर कसा व धडाडून कामाला लागा. आता प्रश्न येतो जिद्दीचा. जिद्द काय असते हे तुम्हाला एका सत्यकथेतून सांगतो. 

या घटनेतील पात्राचं नाव आहे कॅरोली (Karoly Takacs). ते हंगेरीयन आर्मीतले वर्ल्डक्लास बेस्ट पिस्तूल शूटर होते. ही गोष्ट आहे सन 1938 सालची.1940 साली होणा-या ऑलिंम्पिक गेम्समध्ये कॅरोलीच गोल्ड मेडल जिंकणार याची सगळ्यांना खात्री होती. अशातच होऊ नये ते घडलं. एका आर्मी ट्रेनिंग कॅम्पच्या दुर्घटनेत फुटलेल्या हॅन्ड ग्रेनेडच्या स्फोटात, त्यांचा उजवा हात निकामी झाला. ज्या हाताने ऑलिंम्पिकच्या सुवर्णपदाची स्वप्न दाखवली होती, तोच हात निकामी झाला होता. सगळी स्वप्न अनोळखी अंधा-या खोलीत गडप झाली होती. परंतु हार मानेल तो कॅरोली कसला! जिद्दी तो जिद्दीच असतो. त्यांनी आता आपले पूर्ण लक्ष त्यांच्या डाव्या हाताला ट्रेन करण्यासाठी लावलं. आणि वर्षभरात म्हणजेच 1939 नँशनल चँम्पियनशीप जिंकली. याला म्हणतात जिद्द. पण खरी मजा तर पुढे आहे आणि ती म्हणजे ते इथेच थांबले नाहीत, तर त्यांचं खरं लक्ष पुढे होत आणि ते म्हणजे 1940 चे ऑलिंम्पिक गेम्स. परंतु वर्ल्डवॉर मुळे 1940 आणि 1944 चे ऑलिंम्पिक गेम्स रद्द झाले होते. अशा वेळी ते इथेही मनाने हारले नाहीत, की निराश झाले नाहीत. किंवा त्यांची जिद्द – सुवर्ण पदक मिळवण्याची तळमळ तसूभरही कमी झाली नाही. आता लक्ष होत 1948. या वेळी मात्र त्यांचा मुकाबला जगातील तरुण स्पर्धकांशी होता. आणि कँरोलीचं वयं होत 38 वर्ष. 1938 ला ते होते 28 वर्षांचे. परंतु ऑलिंम्पिकचे पदक मिळवण्याच्या जिद्दीने त्यांच्यातील ही आग पुढील 10 वर्ष विझू दिली नाही. यातच त्या जिद्दीची खरी सफलता आहे, असे मला वाटते.

या डाव्या हाताच्या शूटरने त्या वेळेच्या तरुण, चपळ, एकापेक्षा एक अशा सरस शुटर्सना मागे टाकत केवळ 1948 च्या नाही, तर 1952 च्याही ऑलिंम्पिक सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. असे करणारे ते पहीलेच ऑलिंम्पिक चॅम्पियन होते,. हे वेगळे सांगायला नको.

जिद्दी माणसालाच सिद्धी प्राप्त होते.

मी अभेद्य आहे.

अभेद्य याचा अर्थ होतो, ज्याला कोणीही भेदू शकत नाही असा मजबुत, कठीण, अपराजित, प्रबळ. ज्याची तोड इतरांजवळ नाही. ज्याला पराजित करणे शक्य नाही, असा.

वरिल विचार खरतर मानवी मनाचं चिलखत आहे, असे मी म्हणेन. परंतु या अभेद्यपणाच अजाणतेपणच माणसला ठिसूळ, कमकुवत, कमजोर बनवत असत. व रोजच्या दैनंदिन जीवनात, साध्या साध्या कारणांसाठी आपण अनेक ठिकाणी मोडून पडत असतो.

महाभारतातील एका पात्राला त्याच्या शक्तीची वेळोवेळी आठवण करुन द्यावी लागायची, तसच काहीसं आपल्याही बाबतीत होताना दिसतं. आपल्यालाही आपल्या कणखरपणाची योग्य वेळी जाणिव करून द्यावी लागते. तरच चमत्कार होताना दिसतात. परंतु असे करून देणाऱ्यांची मात्र वानवा आहे खरी. यासाठी तुम्हाला स्वतःलाच पुढाकार घेतला पाहिजे, अशी आजची परिस्थिती आहे.

स्वतःला घडवण्याचा विडा आज आपण स्वतःच उचलला पाहिजे. यासाठी कुणीतरी आपल्या मदतीला येईल व आपल्यातील अजिंक्य बाजीरावाला जाग करेल, अशी आशा ठेवण्यापेक्षा आपणच मैदानात का उतरू नये ? कोणीतरी येऊन तुमच्यातील असामान्य, अप्रतिम, अभेद्यता जागृत करेल अशा आशेवर तुम्ही जर असाल, तर तुमची निराशा होण्याचीच जास्त शक्यता आहे. अशावेळी तुम्हीच स्वतःला घडवण्याचा ‘पण‘ का करत नाहीत ? 

चला तर मग घ्या एक वेगळी शपथ आणि लागा कामाला.

यासाठी तुम्हाला इथे काही ‘Affirmations’ देत आहेत, त्याचा पुढे तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल.

• मी मजबुत आहे.

• मी सक्षम आहे.

• मी अभेद्य आहे.

• मी एक योद्धा आहे.

• मी संघर्ष करणारच.

• मी जिंकणारच, जिंकणारच आणि जिंकणारच

युद्धात आणि आयुष्यात योग्य वेळी ‘जागा‘ बदलल्यास लवकर जिंकता येत.

अपयशाला मोजू नका.

अपयशाला मोजू नका, अस म्हणण्यामागे कारण की जो आपली आपयशं मोजायला लागतो, त्याला लवकर पुढे जाता येत नाही. शिवाय यशाला आणखी वेळ लागतो. अपयश हे कधी एकट नसत. ते नक्कीच काहीतरी घेऊन फिरत असत. अनेक संघर्षातुनच ‘ब्रिक्स बाय ब्रिक्स‘ यश तुमच्या हाता जवळ करता येतं.

सामान्यतः अस बघीतल जात की, लोक अपयशाला घाबरतात आणि त्यामुळे नविन काहीच करत नाहीत. भितीने ते नविन कोणताच निर्णय लवकर घेत नाहीत. किंवा घेतलेल्या निर्णयावर ठाम राहत नाहीत. याच कारणच त्यांनना अपयशाची भीती असते. खरतर काहीच न करन. अपयशाची भीती बाळगत, १००% यशाचा फॉर्म्युल्यासाठी वाट बघत, रोज नुसत्या काड्या मोडत आलेला दिवस मार्गी लावणे व दिवसाचा शेवट कृतीशुन्य करणे. हेच खरे अपयश आहे असे मला वाटते.

तुम्ही तुमच्या बद्दल काय विचार करता हे जास्त महत्वाच आहे. त्यामुळे तुम्ही जसे आहात तसे, ते-ते करायला घ्या, जे-जे तुम्हाला भविष्यात करायच आहे. फार जास्त विचार करत बसलात तर पिकलेलं फळसुध्दा खराब होत. तेव्हा वेळीच कृती करा. अपयशाची भीती बाळगत बसू नका. ती कशी कमी करता येईल त्यावर काम करा. जसं एखाद्या प्रोडक्टला विकायला त्याची ‘अॅट्रॅक्टीव पॅकेंजिंग‘ लागते. अगदी य़शाचंही तसंच असतं. याला सुध्दा तुमच्या अनुभवाची, शिक्षणाची, डेरिंगची (अपयशाची) पँकेजिंग लागतेच. ती जेवढी जास्त, तेवढी चांगली. तेवढीच यशाची किंमत आणि मजा मोठी. मित्रांनो अपयशाला मी अप – म्हणजे वरती यश म्हणजे यश. म्हणजेच जे यशाच्या वर आहे ते अप - यश. त्याल कमी लेखू नका. घाबरू तर मुळीच नका. त्याचा सामना करा. त्याचा आनंद घ्या. पुढे जा. कारण पुढे यश तुमची वाट बघत असत. 

एक यश तुमच्या अनेक अपयशाच्या किंमतीच सोन करत.

(यशासाठी) ‘मी‘च का नाही? 

सगळ्यात अगोदर दुस-याचा विचार करायला शिका, असे आपल्यावर संस्कार झालेले असल्या कारणाने आपण जे – जे चांगल, ते-ते दुस-यात शोधायची आपल्याला सवय झालेली आहे. ‘शिवाजी महाराज जन्माला येवोत पण शेजा-याच्या घरात‘ ते काही उगाच म्हणत नाही. शिवाजी महाराज हे यशाचे, प्रयत्नाचे, हिंमतीचे, पराक्रमाचे, कॅल्युलेटेड रिस्क, योग्य प्लॅनिंग, धाडस (आणि अनेक) गुणांच एकत्रीत अदभुत, अकल्पित, अविस्वसनिय मिश्रण आहे. ते कदापी आपल्याला जमनार नाही. परंतु त्यांच्यापासुन प्रभावीत होऊन आपण नक्कीच अनेक गोष्टी साध्य करू शकतो. हे मात्र खर आहे. परंतु खरी गडबड इथुन पुढे आहे आणि ती म्हणजे, ती करण्यासाठीची किंमत मेजण्याची आपली नसलेली मानसिकता.

कोणत्याही अवघड, अवजड, धाडशी वाटेवर कोणीतरी दुस-याने वाटचाल करावी व आपण त्याच अनुकरण करत शांतपणे आनंदी, सुखी (जे की खरतर – नसतं.) आयुष्य जगाव अस वाटत असत. मोठ यश मिळवायला मोठ धाडस लागत. आणि ते करायला हिंमत लागते. हिमंत आणा. सगळ होईल. आपण नको तिथ फुकटची डेअरीग करत फिरतो. ज्याला खरतर कोणीच विचारत नाही. जस की लहान वयात बिडी ओढने, दारू पिणे, मुलींना प्रपोज करने, मोटारसायकल सुसाट पळवने वगैरे वगैरे. आणि आपण नको त्या गोष्टींना अवास्वत महत्व देऊन खरतर स्वतःची दिशाभुल करतो. आणि आयुष्यात आपलाही ‘गोट्या‘च होतो. 

आपली खरी गफलत अशी आहे की, कमी चाललेली – नविन वाट चालायची की, गर्दीचा – गुळगुळीत झालेला रस्ता धरायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न जरी असला तरी पहील्या पर्यायाला स्पर्धक नसतात किंवा असलेच तर फारच कमी असतात. आणि ते ही आपल्याच तोडीचे असण्याची शक्यता जास्त असते.

मोठ्या यशासाठी ‘मी‘ च योग्य आहे, आणि मी ते मिळवण्यासाठी माझ्यात जे-जे सकारात्मक बदल करायची मला गरज आहे ते-ते मी करणारच, अस स्वतःला वचन द्या. जर तुम्ही अस करण्यात यशस्वी झालात तर, यशाच्या सुर्याला स्पर्श केल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत हे नक्की. यालाच दुस-या शब्दात अस म्हणता येईल की, - माझा मार्ग बदलला तरी माझ ध्येय बदलनार नाही. त्या परमेश्वराने मला तेवढ बळ आणि बुद्धी नक्कीच दिलेली आहे. फक्त प्रश्न आहे, तो या दोघांचा योग्य वापर करून दैदिप्यमान यश मिळण्याचा आणि स्वतःबरोबरच जगालाही ठासून सांगण्याचा की – ‘यशासाठी मी च योग्य आहे‘. यशासाठी मी च योग्य आहे. 

मोठी संकट तुम्हाला मोठं करतात, त्यांना भिडायला शिका.

।। धडपड ।।

मलाच स्वतःला चाचपडून पाहीचं आहे,
स्वतःला एकदा सिद्ध करायच आहे
काहीतरी कर-कर म्हणत, आई थकुन गेली,
तिचीही आता साठी सरुन गेली,

मित्र नुसतेच जोडले, त्यांनी वेळ आणि पैसे ओढले,
आता मला त्यांच्यापासुन लांब रहायच आहे. कारण ...
धक्के खाण्याचं मरन रोजचच आहे,
ध्येय नसल्याने मीच रचले स्वतःचे सरन आहे,

त्या सरनातून आता धडपडून उठायच आहे, कारण...
आयुष्यात मी काहीतरी करु शकतो, हे नक्की आहे,
स्वतःला दिलेला शब्द पाळणार आहे,
आजपासुन रोज वेगळा जगणार आहे,

आणि तुम्हाला यशाच्या शिखरवर दिसणार आहे,
कारण मलाच स्वतःला चाचपडून पाहीच आहे,
स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करायच आहे.
कारण मला जिंकायच आहे.
कारण मला जिंकायच आहे.

 विश्वास वाडे

४ टिप्पण्या:

  1. सूंदर,सहज व सोपी भाषा तसेच नेमके जे महत्वाचे ते कमी शब्दात पोहचले. जे शब्दांकित केले आहे ते तर खूपच महत्वाचे आहे, एकुणच अमुलाग्र बादल घडवायची ताकद असणारे . धन्यवाद आणी शतशः आभार वाडे साहेब

    उत्तर द्याहटवा