ऋतुगंध समिती परिचय


निरंजन नगरकर (संपादक)
गेली ११ वर्षे महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे सदस्य. यापूर्वी देखील १-२ वर्षे ऋतुगंध समितीत काम केले आहे. मंडळाच्या इतर उपक्रमांत सहभागी होऊन काही कार्यक्रमांसाठी निवेदन लिहिले व केले आहे. गुंतवणूक क्षेत्रात काम करत असताना लेखन करण्याचा छंद जोपासला आहे. तसेच मंडळाच्या 'शब्दगंध' या कविगटाचे ते सक्रिय सभासद आहेत. ह्याव्यतिरिक्त इंटरनेटवरील काही संकेतस्थळांवर हौशी लेखन करत असतात.

सुमेध ढबू (सहसंपादक)
३ वर्षांपासून ऋतुगंध समितीमध्ये सहभाग.  ऋतुगंधच्या blog ची जबाबदारी सांभाळताना लेखक सूची तयार केली. सिंगापूरमधील वास्तव्यात मंडळाच्या (आणि भारतीय संस्कृतीशी निगडित इतर संस्थांच्या) विविध कार्यक्रमांमध्ये स्वयंसेवक म्हणून सक्रिय सहभाग. सिंगापूर सोडल्यानंतरही ऋतुगंधच्या माध्यमातून मंडळाशी बांधिलकी जपली आहे. वाचन, खेळ, भारताचा आणि मराठ्यांचा इतिहास, गड-किल्ले ह्यांची विशेष आवड आहे.


 दीपिका कुलकर्णी (ब्लॉगर): 
मागील वर्षापासून ऋतुगंध समितीमध्ये कार्यरत. एमबीए (मार्केटिंग) मध्ये शिक्षण व मीडिया इंडस्ट्री व डिजिटल मार्केटिंग मध्ये १० वर्षांपासून कार्यरत आहे. यापूर्वी मराठी वृत्तपत्रात उपसंपादक व ऑनलाईन वेब पोर्टलसाठी मराठी भाषातज्ज्ञ म्हणून कार्य केले आहे. लेखनाची आणि साहित्याची विशेष आवड असल्याने पत्रकारितेची पदविका प्राप्त. प्रवास, फोटोग्राफी, 'आर्ट अँड क्राफ्ट' हे खास छंद जोपासले आहेत.



प्रफुल्ल मुक्कावार (ब्लॉगर) 
मागील वर्षीसुद्धा त्यांनी ऋतुगंधमधे काम केले आहे. व्यवसायाने अ‍ॅटोमेशन ईंजिनीअर असून लेख आणि कविता लिहिण्यात विशेष रुची आहे. TheBetterIndia आणि RiseForIndia या ऑनलाईन माध्यमात ते सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्तींबद्दल लिहितात. तसेच, Shivprabha Charitable Trust मध्ये सदस्य आहे.


शीतल होलमुखे (ब्लॉगर) 
ऋतुगंध टीम मधीलच नवीन सदस्य नसून, सिंगापुर मध्येही नवीनच आहेत. ब्लॉग ऑपरेशन्स आणि गरज पडल्यास जनसंपर्क ह्या प्रमुख जबाबदाऱ्या. डिजिटल मार्केटिंग मध्ये करिअर आहे.  आवडते छंद वाचणे, प्रवास करणे आणि फोटोग्राफी हे आहेत. त्या व्यतिरीक्त केशभूषा आणि रंगभूषा ह्यांचे प्रशिक्षण घेतले आहे. MMS वाचनालयाच्या कामांमध्ये देखील सहभाग आहे.




        भाग्यश्री गुप्ते (जनसंपर्क) 
        मागील  ४ वर्ष मंडळाची सदस्य असून मंडळाच्या अनेक कार्यक्रमात                 फोटोग्राफर म्हणून कार्यरत आहे. यंदा ऋतुगंध टीम मधे आहे. फोटोग्राफी            हा त्यांचा आवडता छंद आहे. 


२ टिप्पण्या:

  1. सिंगापूरमध्ये स्थायिक मराठी लेखकांचे कथासंग्रह व कांदबरी आत्मचरित्र अशी पुस्तके प्रकाशित आहेत का असेल कृपया त्वरीत माहिती पाठवा अशी विनंती कारण माझा पीएच. डी. चा विषय'अनिवासी भारतीय मराठी साहित्याचा अभायास'असा आहे

    उत्तर द्याहटवा
  2. कृपया आपला सिंगापूरचा पत्ता व फोन नंबर मिळेल का . बेळगावहून माझे मित्र तिकडे पोचताहेत . कांही हवे असल्यास कळवा . किशोर मधुकर काकडे 9449858618

    उत्तर द्याहटवा