जाणीव

ऋतुगंध वर्षा - वर्ष १२ अंक ३


काय म्हणालास,
तुझ्या रचनेचा हा सुंदर पिसारा 
अरे, हा सारा 
तूच दिलेल्या जाणिवेचा पसारा.

या पिसाऱ्यातून
हा पसारा वेगळा करून बघ,
दिसेल ते निश्चल उदात्त 
मूलभूत रूप
तुझेच, मला दिलेले.
आकाशाने स्वतःचे प्रतिबिंब 
संथ गंगेत बघावे, तसेच..

होय रे, आपल्या अद्वैताची 
ती ही एक जाणीवच!!

- स्वप्नील सुधीर लाखे 



1 टिप्पणी: