मी आणि आई बाबा

मला महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या स्पर्धेत बक्षीस मिळाले होते. त्या स्पर्धेमध्ये प्रश्न-उत्तर आणि कविता सादर करायची होती. त्या स्पर्धेत मी माधव जुलियन यांची "प्रेमस्वरूप आई" कविता ऐकवली होती. अजूनही मला ती कविता लक्षात आहे. माझे आई-बाबा कामाला जातात, तरी घरातील कामे, आमचा अभ्यास, पाहुण्यांचे येणे जाणे, यामधून वेळ काढून त्यांनी माझ्या कडून ती कविता पाठ करून घेतली आणि अर्थ सांगितला. माझ्या बाबांनी ती रेकॉर्ड करून परत परत ऐकवली आणि मी त्या स्पर्धेत दुसरा नंबर मिळवला.

त्यांनी अशीच खूप बड-बड गीते, गाणी, गोष्टी, नाट्यछटा, करून घेतल्या आहेत. गणपती उत्सवात मी एकदा गणपतीचे गाणे अभिनय करून म्हटले होते. सगळ्यांनी खुश होऊन खूप टाळ्या वाजविल्या. तसेच मी बाबांबरोबर गणपतीची गोष्ट नाट्यछटेतून सादर केली, तसेच गुढीपाडव्याच्या कार्यक्रमात आईची नक्कल केली होती. आईची वाक्ये वापरली होती. "नाहीतर श्रीखंडच संपून जाईल", माझ्या या वाक्यावर सर्व लोकांनी टाळ्या वाजविल्या. या सर्व गोष्टींमागे आई बाबांनी घेतलेली मेहनत आठवते.

आमच्या घरात प्रत्येक मराठी सण साजरा केला जातो. संक्रांतीला गुळपोळी, होळीच्या दिवशी पुरणपोळी, गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी, गणपतीमधे मोदक, दिवाळीमधे सर्व फराळ, असे आई बनवते. अशा रितीने आई, बाबा, आजी, आबांनी नेहमी मराठी भाषा बोलून मराठी संस्कृती जपून ठेवली आहे, याचा मला अभिमान वाटतो!!- अनुष्का वर्तक

 वय ८ वर्षे 

७ टिप्पण्या:

 1. ममसि चे आभार हा लेख प्रकाशित केल्या बद्दल

  उत्तर द्याहटवा
 2. मस्त आहे अक्षर!! अभिनंदन अनुष्का!

  उत्तर द्याहटवा
 3. अनुष्का,मी पहिल्यापासूनच तुझी फॅन होते, आहे आणि यापुढेही राहीन :)

  उत्तर द्याहटवा
 4. कीत्ती गोड लिहीले आहे. हस्ताक्षरही नेटके आहे. अभिनंदन आणि खूप खूप कौतुक अनुष्का !

  उत्तर द्याहटवा