ऋतुगंध ग्रीष्म - वर्ष १२ अंक २
विचारांच्या चक्रात भूत, भविष्य, वर्तमान,
आकर्षणाला सतत देत राहातंय आव्हान।।
त्रिकालज्ञानी सृष्टीकर्त्याला खरी असते जाणीव,
मानवाच्या स्मरणशक्तीत सततची उणीव ।।
कर्म अन् प्रारब्धाच्या मीलनात गोवलंय जरी जीवन,
पण देहबुद्धीपलिकडे नाही कुठलं आकर्षण।।
सत्संगतीच्या मार्गात अडथळ्यांचे पाषाण,
मनोमन असू दे सतत ह्याचं भान।।
सत्कर्मांची कास धर, मनी हा विश्वास धर,
आकर्षणाच्या नियमावर श्रद्धेनी मात कर ।।
- नंदिनी नागपूरकर
छान
उत्तर द्याहटवा