मेथी मुठीया

आपल्यातील बऱ्याच जणांना मेथीची भाजी आवडत नाही , परंतु कडू रस तर आपल्या खाण्यात असलाच पाहिजे. मेथी मुठिया हा एक चविष्ट पर्याय आहे मेथी खाण्याचा. 

साहित्य:

मेथीची एक जुडी (पाने निवडून साधारण 150 -200 gms होतील )
गव्हाचे पीठ 3 वाट्या (300 gms)
किंवा गव्हाचे पीठ 150gms +थोडे ज्वारी पीठ +थोडे बाजारी पीठ + थोडे बेसन + थोडे नाचणी पीठ ( मी हाताशी असतील ती सगळी पीठं घालते )
आलं -लसूण -मिरची पेस्ट -2 चमचे 
हळद 
हिंग 
हवी असल्यास मिरची पूड 
एका लिंबाचा रस 
चवीप्रमाणे मीठ 
पाव चमचा खाण्याचा सोडा 
फोडणी साठी तेल , मोहरी , तीळ 

कृति :

मेथीची पाने धुऊन, निथळून, चिरून घ्यावी सर्व पीठे , चिरलेली मेथी , आलं -लसूण-मिरची पेस्ट , हळद , हिंग , सोडा , मीठ , लिंबाचा रस एकत्र करून पोळ्यांप्रमाणे पीठ मळून घ्यावे. 

मळलेल्या पीठाचे एक इंच जाडीचे रोल्स बनवून ते 15-20 मिनिटे वाफवून घ्यावेत. 

वाफवलेले रोल्स थोडे थंड झाल्यावर त्याचे छोटे तुकडे करावे. 

कढईत 3-4 tbsp तेल गरम करून त्यात मोहरीची फोडणी करावी. मोहरी तडतडल्यावर तेलात 2-3 चमचे तीळ घालावेत. 

लगेचच वाफवलेल्या मुठिया घालाव्यात आणि 3-4मिनिटे वाफ येईपर्यंत झाकून ठेवावे. 

गरमा -गरम मुठिया तयार.



अरुंधती घुमण 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा