मंडळातील घडामोडी

ग्रंथालय - महाराष्ट्र मंडळाच्या पुस्तक प्रेमींसाठी आनंदाची बातमी. गेले वर्षभर योग्य जागेच्या अभावी बंद असलेले मंडळाचे ग्रंथालय ४ जानेवारी २०२० पासून ग्लोबल इंडियन स्कूल, पुंगोल येथे सुरु झाले आहे. ग्रंथालयाची वेळ दर शनिवारी सकाळी १०.३० ते १२.३० अशी आहे. सध्या ग्रंथालय मध्ये कथा, कादंबरी, पर्यटन, शैक्षणिक, ऐतिहासिक, अध्यात्म अश्या विविध विषयांवरची साधारण २००० पुस्तके आहेत. मंडळाच्या सभासदांनी या ग्रंथालय सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.




आगामी कार्यक्रम

गीत रामायण – महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. मा. आणि सर्वांचे लाडके ‘बाबूजी’ सुधीर फडके यांच्या अद्भूत प्रतिभाविष्कारातून साकारलेले गीत रामायण ही अवघ्या महाराष्ट्राची सांस्कृतिक ठेव आहे. असा कार्यक्रम आपल्या मंडळाच्या गायक/वादक कलाकारांकडून सादर व्हावा हा मंडळासाठी आनंददायी योग आहे. कार्यक्रमाचा तपशील पुढील प्रमाणे:-

दिनांक – २२ फेब्रुवारी २०२०
वेळ – दुपारी ३.३०
कार्यक्रम स्थळ – सिंगापूर पोलिटेक्निक सभागृह, ५००, डोवर रोड, १३०६५१.

रसिकांनी या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद द्यावा आणि आपल्या स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन द्यावे.

वार्षिक सर्वसाधारण सभा – मंडळी बघता बघता वर्ष सरलं. सध्याच्या कार्यकारणीची निरोप घेण्याची वेळ जवळ आली. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वर्षभर झालेल्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल तसेच वार्षिक ताळेबंद सादर होईल. नवीन कार्यकारिणीची निवड सुद्धा होईल. वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख आणि स्थळ लवकरच इमेल द्वारे कळवण्यात येईल. सभासदांनी मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहावे ही विनंती.

श्यामल भाटे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा