भ्रम



भावनांच्या कोषात गुरफटून 
मनभर प्रेम जतन करून
शांत निवांत बसून राहतं -मन
घेवून स्वत:कडची मायेची ऊब 
कधी कोणावर 
जीवापाड प्रेम करतं
स्वत:कडचं मणभर प्रेम
आनंदाने लूटून टाकतं
प्रेमाच्या परतफेडीची 
वाट बघत बसतं..

प्रेमाच्या बदल्यात प्रेम
सौदा काही वाईट नाही
पण तोही कधी कधी
जमून येतोचं असं नाही
मनं बिचारं हिरमुसतं
कधी एकटं मुसमुसतं
मनातल्या मनांत 
रूसून बसतं
वाट पहात प्रेमाची.. 
.... तेवढचं बरोबर घेवून 
कुणी जवळ येत नसतं


मनं बिचारं हिरमुसतं
कधी एकटं मुसमुसतं
मनातल्या मनांत 
कुढत बसतं
वाट पहात प्रेमाची
.....तेवढचं बरोबर घेवून 
कुणी जवळ येत नसतं
मनं बिचारं हिरमुसतं
कधी एकटं मुसमुसतं
मनातल्या मनांत 
रडत बसतं
वाट पहात प्रेमाची
....तेवढचं बरोबर घेवून 
कुणी जवळ येत नसतं


मन मग विचारात पडतं
आपलं काही चुकलंय कां
तपास करतं 
कुणीच नाही कां
आपलं असं?
कधी ,कुठे ,काय ..चुकलं कसं?
प्रेम देण्यात चूक कसली?
आसपासची तर सगळीच आपली!
प्रश्नांची ऊत्तरं शोधत बसतं
सापडत नाही उत्तर
तरीही शोध घेत राहते नजर
संपून प्रेमाचा कण अन् कण

मागे उरतं फक्त 
शुष्क आणि कोरडं मन
त्याची आतली तळमळ
कळत नाही कुणाला
फसवणूकीची जळजळ
शेवटी होवू नये ते होतं
प्रेमचं मनाचा घात करतं
प्रेमचं मनाला झपाटतं
झटपटून मन एकदाच
जणू काही पेटून उठतं
धुमसलेला ज्वालामुखी
धमाक्याने फुटतो
आसपासचा परिसर सार
क्षणांत भस्म होतो
आता घाबरतात सारे ,
जवळ यायला
कारण आणखी एक सापडतं,
नसलेलं नातं संपवायला
मनं पुन्हा हिरमुसतं
पुन्हा एकटं मुसमुसतं
मनातल्या मनांत 
पुन्हा कुढतं बसतं
पुन्हा पुन्हा रडतं
थोडं थोडं चिडचिडतं
वाट प्रेमाची बघत बसतं
आणि शेवटी भडकतं
कारण प्रेम बरोबर घेवून
कुणीच जवळ .. 
... येतच नसतं

म्हणे मन हळवं असतं
म्हणे अपेक्षांच जाळं विणतं
म्हणे उगाच पेटून उठतं 
इतकं सगळं सरळ सोपं 
खरचं ?! सारं .. अचानक घडतं ?!


~युगंधरा परब

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा