रागरंग

म्हणाल तर खूप करता येतात उपदेश,
पण दिशादर्शकाचं काम काय बरं विशेष?
सगळ्यांचा सखा जिवलग मित्र,
पण त्यालाच जोपासणं अगदी गलितगात्र!

गुणांच्या यादीत नसे ह्याला स्थान,
चुकूनही करता येत नाही ह्यावर अभिमान,
जाणिव-उणीवेत मनुष्य सदैव पुढे,
ह्याच्या संगतीत सर्वच उणेदुणे,
पदोपदी असंतुलनानी करतो हा घात,
जिवलगांच्या मनावर करतो सदैव आघात,
कालांतरानी होते मग चुकांची जाणीव,
पण दुरुस्तीत मनाच्या समजुतीची उणीव,
ह्याच्या मित्रांना नकोच मानाचं स्थान,
अन्यथा विनाकारण नकारात्मक भावनांना मान,

सहज जमेल अशी श्रद्धा सबुरी हवी,
शांती समाधानात गवसेल खरी दुनिया नवी,
तिळातिळानी करावी सतत उजळणी,
यशाच्या पायरीवर समाधानाची बोळवणी,
दडलेल्या रहस्याला गवसेल नवी वाट,
अन् समाधानानी अनुभवावा आयुष्याचा थाटमाट!


-नंदिनी नागपूरकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा