पुदिना भात

ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २


साहित्य

मसाला: कोथिंबीर १ मध्यम गड्डी, पुदिना १/२ गड्डी, सुके खोबरे ३-४ तुकडे साधारण पाव वाटी, लाल सुकी मिरची, ४-५ ( चवीप्रमाणे) कढीलिंब २ डहाळ्या. 

तयारी: हे सर्व पदार्थ मिक्सर मधून बारीक करणे. २ लिंबाचा रस काढून ठेवणे.

तांदूळ १ किलो घेऊन भात पूर्ण शिजवून घेणे आणि चाळणीत काढून घेणे.

कृती: १ वाटी तेल गरम करणे. जिर मोहरी हिंग आणि वाटलेला मसाला घालून परतून घ्या. त्यात मीठ घाला.

आता शिजलेला भात घालून परतून घ्या. वरून लिंबू पिळा आणि गरम गरम आस्वाद घ्या.

- सुवर्णा कुलकर्णी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा