ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २
प्रश्न विचारणाऱ्यांची
विचार करणाऱ्यांची
उत्तर देण्याची
सामोरे जाण्याची
नियम बनवणाऱ्यांची
नियमांच्या नियमकांची
जमलेल्या व्यवस्थेची
जागरूक नागरिकांची
विनोद वीरांची
चिरकुट चित्रकारांची
सामान्यांच्या रहाटीची
रोजच्या खाण्याची
महिला सशक्तीकरणाची
तिच्या निवडण्याच्या हक्काची
भीती मला दिनराती
झोप ना रात्रीची
-अनंत शिंदे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा