मधुबाला

ऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ३

एक कळी नाजुकशी
हळूवारपणे उमलली
इकडे तिकडे पाहू लागली
अन् स्वतःशीच ती खुदकन् हसली ||१||

हास्याने त्या चांदणे फुलले
बकुळफुलांचे गंध बहरले
अमृताचे सडेच पडले
अवघे जन हे लुब्ध जाहले ||२||

अवखळ अल्लड खट्याळ बाला
पाहूनी कलिजा खलास झाला
तिच्यापुढे तो चंद्रही लाजला
मत्सराने खंगू लागला ||३||

ते मधुहास्य लोपले लोपले
हन्त! अकालीच ते कोमेजले
जगाला चटका लावून गेले
काळाने खुडले कळीला
ती कळी होती मधुबाला!
ती कळी होती मधुबाला!! ||४||

                          - निर्मला नगरकर
I






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा