ऋतुगंध वर्षा वर्ष १३ अंक ३
श्रावण सर सरसर आली
भावुक ह्रृदयात हुरहुर दाटली
अल्लड तारुण्य मोहरुन आले
फूल मनाचे बहरुन आले
गंध पसरला कळी फुलतांना
गीत स्फुरले गळा घेई ताना
घेउन गिरकी पाय थिरकती
हातानाही मग पंख फुटती
विहंग होउनी विहरु आकाशी
हाच विचार येई मनाशी
पाऊस फक्त बहाणे जयाचे
जीवन झाले गाणे तयाचे
- किशोर नेवगी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा