'मातीचा विश्वास '

तशी ती हट्टी असते
पण एकदा सूत जमलं 
की ती अधीन होते तुमच्या
जेव्हा तिला समजून घेण्यासाठी 
तुम्ही पुरेसा वेळ देताय
ह्याचा विश्वास तिला वाटतो


मग ती सहजावते
वळते, ताणली जाते
तुम्ही म्हणाल ते मुकाट्याने ऐकते
चाकावर टाकलं की
तुम्हाला चक्रावून टाकत नाही 
चाकाशी संलग्न होते


चाक माती आणि तुम्ही 
गतीशी एकतान होता
त्यातून काही आकारतं
नेमकं कोण कोणाला
घडवत असतं कुणास ठाऊक?
तिनं कित्येक युगं पाहिलीएत

 अर्चना रानडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा