अद्वैत

ऋतुगंध हेमंत  - वर्ष १२ अंक

तुझी आणि माझी स्वप्ने एक आता
एक झाल्या वाटा 
जन्मोजन्मी

असू दे बिकट चालू दोघे वाट
हातामध्ये हात 
गुंफूनिया

मनासी मनाचे मीलन आपुले
हे तो ठरलेले 
नि:संशय

जशा नित्यनेमी विविध रंगात
वेली वसंतात 
फुलारती

नको मज आता चंद्र सूर्य तारे
सामावले सारे 
तव नेत्री

टाक दु:खे तुझी माझिया पदरी
घे अन हासरी 
सुखे माझी

कायाछायासम संगती मी तुझ्या
ऐक रे तू माझ्या 
जीवलगा


- भवान म्हैसाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा