सप्रेम नमस्कार,
नवरात्र, दसऱ्या नंतर वर्षातील सर्वात मोठ्या सणाची म्हणजेच दिवाळीची घरोघरी तयारी सुरू झाली असेल. फराळ कधी करायचा? की विकतच आणायचा? नवे कपडे खरेदी कुठे करायची इत्यादी गोष्टींची चर्चा झाली असेल. भारतात असताना ह्याच दरम्यान दिवाळी अंकांची, दिवाळी पहाट कार्यक्रमांची वाटही लोक पहात असतात. वाचकांना रसिकांना ही मेजवानीच असते. महाराष्ट्र मंडळ सिंगापूर ने सुद्धा एका रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन आपल्यासाठी केले आहेच आणि वाचनानंद आपल्याला मिळावा यासाठीआपला "ऋतुगंध शरद" दिवाळीच्या निमित्ताने प्रकाशित करत आहोत.
"विश्वास " केंद्रकल्पना असलेल्या ह्या अंकात ८ कथा आपल्याला वाचायला मिळणार आहेत. नेहमीच्या लेखमाला, ललित, कविता देखील आहेत. कोणत्याही नात्याचा पाया असलेली विश्वास ही भावना वेगवेगळ्या नात्यांच्या संदर्भात ह्या सर्व साहित्यातून उलगडली आहे.
आपल्या बालकलाकारांच्या किलबिल चित्रांबरोबर प्रौढ चित्रकारांची चित्रकलाही आपल्यासमोर सादर करीत आहोत.
अंक कसा वाटला ते जरूर कळवा. आपल्या मित्रमंडळींपैकी कोणाला ऋतुगंध साठी साहित्य पाठवायचे असल्यास आमच्याशी जरूर संपर्क करा.
सस्नेह
ऋतुगंध समिती २०१९
राजश्री लेले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा