प्राक्तन

ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २
मंदिराच्या कळसाला चप्पल म्हणाली 
माझं प्राक्तन हे की 
मी नेहमीच असते
मंदिराच्या पायथ्याशी
आणि
पादुकांचं प्राक्तन हे की
ती नेहमीच असते
फुलांच्या गादीवर देव्हाऱ्याशी

कळस समंजस उत्तरले
कुणा भक्ताच्या पावन पद-स्पर्शानेचं
चप्पलेची पादुका झालेली असते
पादुका वाट बघत असतात

भक्तांच्या दर्शनाची 
त्यांच्या क्षणभर सहवासाची..
बाई गं ... तुझं प्राक्तन हे की 
तू तर असतेस नेहमीच
भक्ताच्या सहवासात कायमची !!!!

- यशवंत काकड




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा