पावसा... बरस रे !!

पावसाची रिमझिम सुरु आहे .... .फुलांचा दरवळ डोक्यातले तंतू सैल करतोय, भानावर आणतोय. 

तळ्यातल्या पाण्यावर पावसाचे थेंब..... थेंबातुन निर्माण होणारी वर्तुळं.... . पाण्यावर पसरत जाणारी वर्तुळं...... थेंब..... वर्तुळ..... त्याचं पसरत जाणं...... विलीन होणं.... . असे अनेक थेंब.... अशी अनेक वर्तुळे.... .. एकमेकांत विलीन होणारी ! सुंदरच !!! वर्तुळं एकमेकांत मिसळून पाण्यावर रेखली जाणारी ती भौमितिक नक्षी..... . पहातच राहावी अशी......

पाण्यावर अधूनमधून डोकावणारे मासे..... . त्यांच्या निःश्वासातून पाण्यावर उमटलेले बुडबुडे......

अंगाला जाणवणारा, भिडणारा सुखद गारवा...... अंगावर पडणारे पावसाचे तुषार.......

अरे ! ही कोणाची किर्र....... किर्र ....... आवाजातली साद ?

ज्या झाडाखाली उभं राहून हे सगळं अनुभवतेय, त्या झाडावर नजर गेली. चपळ खारुताई.. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर सरसर सरकणाऱ्या....... फांदीवरील पानांमधून काहीतरी खात -खात (?) तुरुतुरु जाणाऱ्या ......

झाडं बोलतात...... . बोलावतात..... . असा भास ?
हे सगळं तना-मनाला भिडतंय........ .
आत खोल भिनतंय .....
हलकं झालेलं, स्वच्छ झालेलं मन !!!

तृषार्त धरतीवर पावसाची पसरण......
धरतीचा निःश्वास, आनंद, तृप्ती...मृदगंध !
ती मृदगंधाची अनुभूती......
ती धरतीच्या सुखावल्याची जाणीव........
शांत झाल्याची जाणीव !

आजूबाजूला सुखावते......
गंधित करते.....
पावसा....... बरस रे.........
तना-'' मनांवर " !!!

धरती सुकलेय रे !
धरती सुकता कामा नये .......
बरस !!!!
गंधित होऊ दे, मला ... त्याला... तिला... चराचराला !!!!

पावसा... बरस रे !!
तना- " मनांवर " !!!


तृप्ती मेहता-देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा