ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २
मी कोण मी कोण
प्रश्न जाळी मनाला
कुडीत या प्राण
फुंकी कोणी कशाला
सृजन संहारचक्र
परमशिवाचा नाद
मी बिंदूमात्र
वाहतो कधीचा
अनंत सोपान
आत्म्याचा प्रवास
विवक्षित वेळा
जन्म झाला सोहळा
रिक्त येणे जाणे
अस्थायी शरीर
मागे उरती फक्त
हे साचे कर्मबद्ध
- प्राजक्ता नरवणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा