अमृततुल्य आनंद

ऋतुगंध वर्षा वर्ष १३ अंक ३
अमृताची गोडी चाखली नसली कधी, 
तर, आठवून बघा जरा,
आयता मिळालेला चहा,
रविवार सकाळच्या पारी. 
किंवा कडक उन्हात चालून,
घामाच्या धारा लागून, 
पाऊल टाकताक्षणी, हातात आईने सरकवलेले, 
लिंबू सरबत घरी. 
बालपणी बाजारात गेल्यावर,
कंटाळवाण्या भाजी खरेदीनंतर, 
थंड लस्सीच्या दाट घोटासाठी गाठलेली,
कोपऱ्यावरच्या दुकानाची छोटीशी टपरी. 
अमृताची गोडी आहे चाखण्यामध्ये, 
अमृताची गोडी आहे चाखायला देण्यामध्ये,
अमृताची गोडी आहे चाखणाऱ्याच्या,
चेहऱ्यावरील अमृततुल्य आनंदामध्ये.
- डॉ अर्चना कुसुरकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा