मनातली गाणी- भाग २

भीतीचा अंश असलेली काही लोकप्रिय गाणी

१. चित्रपट हा खेळ सावल्यांचा - काजळ्या रातीनं ओढून नेला

कवी सुधीर मोघेंच्या काव्याला चालीत बांधले आहे पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी आणि स्वर दिला आहे आशाताईंनी. या चित्रपटाची सर्व गाणी लोकप्रिय झाली होती आणि त्यांची गोडी आजही तेवढीच आहे. हे गाणं जेव्हा प्रसिद्ध झालं तेव्हा ज्यांना भुताची भीती वाटते त्यांना चिडवण्यास वापर होत असे. मला आवडलेला या गाण्यातील एक पैलू आशाताईंनी गाताना भीतीचा आविष्कार अतिशय परिणामकारक केला आहे.



हीच चाल मंगेशकरांनी परत एकदा माया मेमसाब या चित्रपटाकरता वापरली आहे. 



२. चित्रपट महल - आयेगा आनेवाला

नक्षब जरावची यांच्या काव्याला चालीत बांधले आहे खेमचंद प्रकाश यांनी. हा काळ हिंदीत लतादीदींचा सुरुवातीचा काळ होता या गाण्याने त्यांना अमाप लोकप्रियता दिली. लतादीदी नंतरच्या काळात जेव्हा रंगमंचावरून कार्यक्रम सादर करत तेव्हा या गाण्याचा समावेश करत असत. या गाण्याने अभिनेत्री मधुबाला यांनाही तेवढीच प्रसिद्धी मिळाली कारण गाणे जेवढे सुंदर आहे तेवढाच या गाण्यात त्यांचा अभिनय पण पूरक आहे. मला आवडलेला पैलू या गाण्यातील लतादीदींचे उर्दू उच्चार अतिशय स्पष्ट आहेत 


३. चित्रपट गुमनाम - गुमनाम है कोई

हसरत जयपुरी यांच्या काव्याला चाल दिली आहे ती शंकर जयकिशन यांनी. या जोडीचे अनेक चित्रपट प्रसिद्ध झाले पण हा चित्रपट त्यामानाने दुर्लक्षित आहे. या चित्रपटामधील सर्व गाणी लोकप्रिय झाली पण पटकन भीती वाटेल असे हे एकमेव गीत आहे.

४. चित्रपट बीस साल बाद - कही दीप जले कही दिल

शकील बदायुनी यांच्या शब्दांना चाल दिली आहे हेमंत कुमार यांनी आणि स्वर अर्थात लतादीदी. एक आठवण दीदींनी लिहून ठेवली आहे काही आठवड्यांच्या आजारानंतर हे गाणे ध्वनिमुद्रित झाले आपला आवाज जातो की काय ही भीती त्यांच्या मनात होती पण या गाण्याने त्यांना परत विश्वास दिला.

मागे लतादीदीनी आपल्या आवडत्या गाण्यांची यादी काढली होती त्यात या गाण्याचा समावेश केला होता.


- शैलेश दामले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा