ऋतुगंध वर्षा वर्ष १३ अंक ३
ऋतुगंध ग्रीष्म बद्दल सुप्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले म्हणतात,
अंक वाचला. भीती या भावनेचे बरेच पैलू हाताळले आहेत. वेदांपासून, रामदासांपासून, horror films पर्यंत अनेक मुद्दे आले.
परीक्षेची भीती, एखादा पदार्थ पहिल्यांदा करण्याची भीती असं मजेनेही लिहिता आलं असतं. पण एरवी चांगला प्रयत्न वाटला. अभिनंदन. शुभेच्छा.
- मंगला गोडबोले
..................................................................................................................................................................
श्री गौतम म्हैसाळकर यांनी फेसबुक वर दिलेला अभिप्राय
प्रिय सौ. राजश्री,
ऋतुगंध द्वैमासिकाचे सहा अंक माझ्या सुपुत्रामुळे माझ्या ई-मेल वर मला मिळतात. त्या वेळी आवर्जून आठवण येते ती कै. मंगेश पाडगावकर ह्यांची. " सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे .... या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे " ऋतुगंध- ग्रीष्म ह्या अंकातील संपादकीय पानावर तुमचे छायाचित्र असून, संपादकीय कामगिरी तुम्ही उत्कृष्टरित्या सांभाळत आहात ह्याची खात्री पटली. ह्या पूर्वीच्या ऋतुगंध वसंत,ग्रीष्म,वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर ऋतुगंधच्या संपादकीय पानावर असलेली टिप्पणी " सस्नेह ऋतुगंध समिती " अश्या स्वरूपाची होती. संपादकीय जबाबदारी खूपच मोठी असल्यामुळे ऋतुगंध ग्रीष्म, वर्ष १३ अंक २ ह्या अंका बद्दल तुमचे अभिनंदन! महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचा "रौप्य महोत्सव सांगता सोहळा ३/४ ऑगस्ट १९ च्या सुमारास होत असल्याची बातमी आवडली. म. मं सिंगापूर येथील सर्व कार्यकर्ते पूर्ण वेळ काम करत असूनही हौसेने मराठी मंडळासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून सर्व कार्यक्रम उत्साहाने यशस्वी करीत आहेत ह्याचे कौतुक वाटते. ह्या सर्व उपक्रमात शाळेच्या आवारात महाराष्ट्र मंडळास कार्यक्रम करण्यास पूर्ण परवानगी देणारे श्री अतुल टेमुर्णीकर ह्यांचे अभिनंदन. महाराष्ट्र मंडळातील कार्यक्रमात स्नॅक्स व जेवणाची जबाबदारी घेणारे दातार आणि गणेश पूजा अत्यंत व्यवस्थीत करणारे जोशी गुरुजी हे देखील तुमच्या मंडळाचे आधारस्तंभ आहेत.
अध्यक्ष, कोषाध्यक्ष, कार्यवाह आणि सभासद मंडळीत स्त्रिया हिरीरीने भाग घेत असून नाटके, नृत्यकला, लेझीम-ताशा ढोल पथक, गरबा, पाककला, सहली, शब्धगंध, ऋतुगंध, विनोद विशेषांक, लघुकथा विशेषांक, ललित लेखन, काव्यलेखन, संगीत मैफिली, महाराष्ट्र दिन, कोजागिरी हे सर्व उपक्रम वर्षभरात, महाराष्ट्र मंडळ यशस्वीरित्या सांभाळत आहे.
एक गोष्ट जरूर खटकते. महाराष्ट्र मंडळातील सर्व हौशी कलावंत मंडळींच्या साहित्य कलाकृतींना असलेला शेरा "कोणत्याही टिप्पण्या नाहीत" हा अधिकार सभासद मंडळींना असून टिप्पणी देण्याचे काम इतके अवघड का असावे? सौ. जुईली वाळिंबे ह्या अमेरिकेत स्थायिक होऊनही सिंगापूर महाराष्ट्र मंडळाच्या मासिकात "सिने सफर" लेखात गाजलेले सिनेमा व गाणी ह्या बद्दल सुंदर लिखाण करतात. महाराष्ट्र मंडळाचे नवीन सभासद आणि आजीव सभासद वाढणे, तसेच देणग्या- जाहिरातीद्वारे यथायोग्य डॉलर्स मिळवून भारतातून सभासदांच्या समावेत येणाऱ्या पाहुण्यांना जास्त करभार लावू नये.
ऋतुगंध ग्रीष्म अंक वाचनीय असून ह्या अंकातील "भीतीची दुनिया" हा विषय आवडला. "डर जरुरी है" एक डाव भुताचा ही जुनी संकल्पना असून त्यावर लिहिलेले लेख आवडले. आमच्या लहानपणी प्रभात सिनेमातले गाणे प्रसिद्ध होते. "मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची , तू चाल पुढे तुला रे गड्या भीती कुणाची?"
तुम्ही अनुवादित केलेला लेख "जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो" सुंदर असून आवडला. ह्या अंकातील
१) डर जरुरी है. २) विवेक वैद्य लिखित "ट्रेकिंग पाहावे करून " ३) सैतान छाया . ४)मना सज्जना ५)नितीन मोरे लिखित "palga हे लेख छान आहेत.
- आपला दादा
..................................................................................................................................................................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा