ऋतुगंध वर्षा वर्ष १३ अंक ३
सह्याद्रीच्या मनगटाने राखला धर्म महाराष्ट्र सोहळा
जरीपटक्याच्या साक्षीत सजला लक्ष मराठी मावळा
कुशीत तापी कृष्णा गोदेच्या वसली ही मराठी संस्कृती
शक्ती संगे भक्ती नांदली जपता माणुसकीची नाती
शिवशंभुंचे श्वास आमुचे सळसळते रक्त हे देवगिरी
आसिंधुसिंधूचे हृदय स्पंदते गर्जते दक्खनच्या पठारी
रिद्धी सिद्धी समृद्धी इथे नांदते सानंदे अष्टौप्रहरी
शस्त्र शास्त्र पारंगत जनमन गाती श्रीरामकृष्ण हरी
नाथ एक मानुनी सजवली ललाटरेषी ज्ञानेश्वरी
वृत्तीची निवृत्ती साधुनी पूजिली श्रद्धा आणि सबुरी
राष्ट्रकारण प्राण मानुनी आणूया रामराज्य भवताली
दिल्लीचेही तख्त राखू दे महाराष्ट्राची शुभंकर सावली!!!
- स्वप्नील सुधीर लाखे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा