मानवी मेंदू एक अजब रसायन

ऋतुगंध वसंत वर्ष १३ अंक १

मोहब्बत के दम से है दुनियाँ की रौनक,
मोहब्बत ना होती तो कुछ भी ना होता.
नज़र और दिल की पनाहों की खातिर,
ये जन्नत ना होती तो कुछ भी ना होता. 
मोहब्बत बड़े काम की चीज़ हैं… काम की चीज है
"किताबों में छपते हैं चाहत के किस्से 
हक़ीकत की दुनियाँ में चाहत नहीं है
जमाने के बाजार में ये वो शय है
के जिस की किसी को ज़रूरत नहीं है
ये बेकार, बेदाम की चीज़ है
ये बस नाम ही नाम की चीज़ है"… 

लेखनाची आवड़ असल्याने मी नेहमीच"ऋतुगंध" द्वैमासिका च्या विविध अंकांकरता लिहीत असते, तर यंदा ऋतुगन्धच्या वसंत अंकाचा विषय "प्रेम' आहे असे कळल्यावर डोक्यात बऱ्याच विचारांची गर्दी झाली. आणि सहजच 1978 साली प्रदर्शित चित्रपटातले हे अर्थपूर्ण गाणे आठवले.

खय्यामने संगीतबद्ध केलेले, येशुदास आणि किशोर कुमार ह्यांच्या मखमली स्वरांत गायलेले हे गाणे कर्ण मधुर तर आहेच पण,साहिर लुधियानवी साहेबांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण आणि खोल अश्या काव्या मुळेच ह्या गाण्याला एक वेगळीचकिनार लाभली, आणि ह्या गाण्याने सत्तरी च्या दशकात लोकप्रियतेचं शिखरच गाठलं

हे गाणं प्रेमाबद्दल एक सॉफ्ट डिबेट अर्थात वादविवाद च आहे. अमिताभ-राखी, हेमा मालिनी-शशिकपूर ह्या जोड्या प्रेम, आणि त्याची मानवी आयुष्यात असणाऱ्या गरजे/ महत्ते बद्दल वादविवाद करत आहेत असे ह्या गाण्यात दाखविले आहे .

मानवी मन तसेही फारच किचकट असते समजायला. त्यात अनेक भाव भावनांचा गुंता असतो. बऱ्याच वेळी कुठलाही थांगपत्ता न लागू देणारे गूढ़ मन, मला स्वतःला खूपच भ्रमात टाकते.

हेमा आणि शशी कपूर ह्यांना वाटते प्रेमाशिवाय ह्या जीवनाला, त्यातल्या भौतिक सुखांना काहीच अर्थ नाही. तसेच प्रेमाचा काहीच 'अनुभव ' नसलेल्या , किवां बहुतेक प्रेमभंग झालेल्या अमिताभला प्रेम एक बाजारू चीज वाटते जिला नाही, जी पैशांनी खरेदी करता येते.|

प्रसिद्ध साहित्यिक शेक्सपियरने देखील आपल्या साहित्यात जी विविध चरित्रे रंगवली आहेत ती सुद्धा मानवी मेंदू च्या ह्या अजब गुंतागुंती मधून निर्माण झाली असावीत. म्हणूनच विशाल भारद्वाज सारख्या संवेदनशील निर्मात्याने शेक्सपियर च्या कादंबऱ्यांवर आधारित असे तीन चित्रपट बनवलेत, जसे मकबूल (Mechbeth), ओम्कारा (Othello) आणि हैदर (Hamlet). हे सगळे चित्रपट प्रेमाच्या विविध रंगावरच नव्हे तर त्यांतले जटिलतेबद्दल आणि विविध स्तरांवर व्यक्त होण्याऱ्या भावनांना दर्शवतात,उदाहरण द्यायचे झाले च तर काळा आणि पांढरा हे दोन्ही रंग जसे मिसळून ग्रे भुरकट छटेतला एक रंग तयार करतात तसच मानवी मेंदूत देखील अनेक रंगांच्या भाव भावनेचे रंग मिसळलेले असतात म्हणूनच सर्व गुंता ! ("50 शेड्स ऑफ ग्रे")असो,

तुम्हा सर्वाना विख्यात भौतिक शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्ज ठाऊक असतीलच ! ब्लैक होल मिस्ट्री(कृष्ण विवर रहस्ये आणि सापेक्षता वाद सारख्या सिद्धांतावर शोध कार्य करून अत्यंत जटिल आणि रहस्यमय गोष्टींकडे जगाचे लक्ष वेधून विज्ञान जगात खळबळ निर्माण करून जगाची तिसरीही एक बाजू आहे असे ठासून जगाला सांगणाऱ्या भौतिक शास्त्रज्ञाचे अलीकडेच निधन झाले. जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्यांनी आपले आत्मचरित्र लिहिले, त्यात त्यांनी आपले मन जगासमोर उघड़ केले . अकरा dimensions दृष्टीकोनामधून विचार करणाऱ्या स्टीफन हॉकिंग्जला जर कुठल्या प्रश्नांने हैराण केले असेल तर त्यांच्या मते ते होते"ह्यूमन ब्रेन " मानवी मेंदू!

मानवी मेंदू, त्यातली गुंतागुंत, आणि त्यातली न्यूरॉन नेटवर्करूपी जाळी जळमटे ! ते लिहितात, जन्मभर खुर्चीला खिळलेल्या अपंग अवस्थेतच जीवन जगलो असूनही मी मनाला अपंगत्व मात्र कधीच येऊ दिले नाही. मला पडलेल्या पश्नांपैकी सर्वात अवघड असा प्रश्न म्हणजे, प्रेम म्हणजे नेमके काय? वैवाहिक आयुष्यात पत्नी, पारिवारिक सुखा पासून वंचित असलेल्या ह्या जीनियसला प्रेमातली भौतिकी, प्रेमातले रसायन मात्र कसे उमजलं नाही ? हा प्रश्न मला विचारात टाकतो."Traveling to infinity"ह्या पुस्तकात हॉकिंग्ज ह्यांच्या घटस्फोटित पत्नीने त्यांच्या सोबतच्या आपल्या प्रेम रहित वैवाहिक आयुष्यातली रिक्तता जगा समोर उघड़ केली आहे.मुन्ना भाई MBBS चित्रपटात संजू बाबा सोप्या भाषेत ह्या मेंदू च्या ह्या गुंत्याला "केमिकल लोच्या" असं म्हणतो 

मेंदूचा वापर करणाऱ्या लोकांना"ह्दय" हा फक्त रक्ताचे शुद्धिकरण/ रक्ताभिसरण करणारा अवयव असतो असच वाटते,त्याचा प्रेम वगैरे सारख्या भावनेशी मुळीच संबंध नसतो असं त्यांना वाटते. कोरडा विचार करणारी माणसे आज जगात वाढत चालली आहेत। पुन्हा प्रेम भावनेची विटंबनाच नाही का? ज्यांच्यावर आपण प्रेम करतो,ज्यांचा करता जमेल त्या पद्धतीने कष्ट घेऊन त्याना आनंद देण्याचा प्रयत्न करतो,तिच माणसे त्या प्रेमाच अजीर्ण करून घेतात. आपल्या प्रेमाने त्यांचा जीव गुदमरतो ,ही सुद्धा विटंबनाच नाही का? ? हे सर्वच प्रत्यक्ष स्वतःही खुप अनुभवल्या नंतर सुद्धा मी "प्रेम" ह्या भावनेच्या सॉफ्ट अश्या डिबेट मध्येच सापडले आहे. जुने लोक म्हणतात लग्नगाठी ह्या देवाच्या घरीच जुळतात, आणि त्यात मला आजही सत्यता वाटते. पण तरीही आजच्या युगात लग्न जुळवताना आपण त्या व्यक्तीपासून होणारा नफा-तोटा तोलून, उपयोगितेच्या आधारावर आपण त्याला आपल्या आयुष्यात जागा देतो. तरीही प्रेमविवाह, तसेच पन्नास स्थळं पाहून केलेल्या अरेंज्ड मॅरेज दोन्ही स्थितित घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहेत. तेव्हां हे समजून घ्यायची गरज आहे की जर प्रेम हे एव्हढं जटिल असू शकतं, तर त्यातून निर्माण होण्याऱ्या कोड्यांचे निदानही फारसे सोपे नसणार. तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ति जर ह्या अफाट जगात नसली तर ह्या जन्मावर ,ह्या जगण्यावर प्रेम करावेसे वाटणारच नाही. म्हणूनच साहिर लुधियानवी लिहून गेले, तेच मलासुद्धा म्हणावेसे वाटते की

मोहब्बत से इतना खफा होनेवाले
चल आ, आज तुझको, मोहब्बत सीखा दें
तेरा दिल जो बरसों से वीरान पड़ा है,
किसी नाज़नीना को, इस में बसा दें
खरच,मोहब्बत बड़े काम की चीज़ है…

-रुपाली पाठक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा