श्वास-विश्वास



मंदिराच्या गाभाऱ्यापासून ते सूक्ष्मशा कणापर्यंत,
भविष्याचे सुंदर आराखडे रचतो,
कधी कधी त्याला नशिबाशी जोडतो,
माणूस गराड्यात असूनही त्याला एकटाच शोधतो,
कलकलानी वाढणं अन् कमी होणं हीच त्याची वृत्त्ती,
खमक्या मनाची घडे येथे प्रचिती,
भावनेच्या भोवर्यात गती त्याची ठरवते,
मजबूती वर त्याच्या प्रगती विसावते,
माणसाशी त्याचं नातं अंतापर्यंत जडतं,
विश्वासाच्या सानिध्यात स्वप्नही फुलतं,
खोल गर्तेत पडलेल्या आशेलाही खुलवतं,
तोच खरा राजा अन् तोच खरा मित्र,
ह्या एकाच भावनेनी प्रत्येक जण त्याला जपतं....


नंदिनी नागपूरकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा