ऋतुगंध हेमंत - वर्ष १२ अंक ५
नियतीचे दान स्वीकारावेच लागते सर्वांना
जेलरला तुरुंगवास निवृत्तीपर्यंत
काही गुन्हा नसताना
व्याधीग्रस्तांचे विव्हळणे रडणे
डॉक्टर ते सहन करतो
त्याला काही आजार नसताना
नियतीचे दान स्वीकारावेच लागते सर्वांना
पावसाने झोडपले, उन्हाने पोळले,
सांगता कोणाला
जन्म कुणाचा गरिबाघरी, जन्म कुणाचा श्रीमंताघरी
मग उगाच दुःख का ऊरी
हे दान नियतीचे
आपणच सहन करायचे
कधी कधी माणसाला माणसाला मनाजोगतं दान मिळतं
बहरलेलं शेत आणि फुललेलं रान मिळतं
उगाच का असावं उदास, त्याच्या असण्यावर का दाखवावा अविश्वास
तो आहे ना पाठीशी पुन्हा तारुण्य येईल साठीशी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा