प्रवास

ऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६
स्त्री जन्माच्या काही मर्यादा असतात
उंबरठ्याच्या आतच पाऊले बरी दिसतात
तिच अस्तित्व अद्रृष्य 
लक्ष्मणरेषेच्या आत जेरबंद
साखळदंडा शिवाय झाली कोठडीत जायबंद
पण निसर्गाने दिलय तिला अमर्याद वरदान
इवला अंकुर फुलविण्याच्या सामर्थ्याचे दान
स्वत:पलिकडे जाऊन अखंडित प्रेमाचे भरते
आई आणि बळाचे असे शब्दातीत नाते
ह्रदयामध्ये सदोदित वाहे वात्सल्याचा झरा
डोळ्यांमधुनी ओसंडूनी जाती 
अमृताच्या धारा
त्या दोघांचा सदैव असतो 
दुज्या अंतरी निवास 
अपूर्णतेचा पूर्णत्वाकडे असा अनोखा प्रवास

-युगंधरा परब


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा