'स्वतःवर' आणि 'प्रितीचं शास्त्र'


१. 'स्वतःवर' 
स्वतःवर प्रेम करा पण इतकंच
की स्वतःपलिकडे जगता आलं पाहिजे;
स्वतःवर प्रेम करा पण इतकंच
की स्वतःला जोखता आलं पाहिजे
स्वतःवर प्रेम करा पण इतकंच
की स्वतःचा द्वेषही करता यायला पाहिजे 
स्कवतःचा द्रावेष पण करा पण इतकाच
की स्वतःवर प्रेमही करता आलं पाहिजे 

----------------------------------------------------------------------------

२. 'प्रितीचं शास्त्र'
सांगता लटके प्रिती जडली
पुसशी तू दाव तिची मिती
पण आहे बक्कळच उरली
व्यापून पुरती अवकाशांती
वाढतसे नित खोली
अन रुंदावते रे उंची
तोकडी परिमाणे 
जळ्ळी मेली मीटर फुटांची
जरी मोजावयाचीच म्हटली 
टाकली तराजूत
परी कापसापरी उडते
करीत वज्राचे घात
सतत मनी हिचा पाझर
मोजू लावूनी शेर लिटर
हिमनगापरी आणखी खोल
अजून उरली किती दाथर
नाही ही शास्त्राची कृती
फोल ठरती सारी परिमाणे
सोडून दे तू यत्न गणिती
उमजून घेई मनाने

- अर्चना रानडे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा